
संगमेश्वर तालुक्यातील आपल्याच वडिलांचे अपहरण करणार्या मुलाला ३ दिवसांची पोलीस कोठडी
वडिलांचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीकांत दत्तात्रय मराठे याला बुधवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. श्रीकांत याच्याकडून दुचाकी व सुरा पोलिसांनी जप्त केला आहे.
श्रीकांत याने वडिलांचे हात- पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावत त्यांचे फोटो व्हॉटस्ऍपवर टाकून घरच्यांकडून १ लाखाची खंडणी मागितली. आई सुनिता मराठे यांनी देवरुख पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून चिपळूण बसस्थानक येथून श्रीकांत मराठे व दत्तात्रय मराठे यांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ताब्यात घेतले.
www.konkantoday.com




