
लांजा गवाणे गटातून अमृत गोरे अपक्ष लढण्याची तयारी
लांजा : नुकत्याच जाहीर झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठीच्या आरक्षण सोडतीत लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. या गटातून अमृत अंकुश गोरे अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत.
या गटात गवाणे, खानवली, लिंबूवाडी, हर्चे, भडे, कोट या गावांचा समावेश असून, आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अमृत गोरे यांनी आपला दांडगा संपर्क आहे. उगवते तरुण नेतृत्व म्हणून अमृत गोरे यांच्याकडे पाहिले जात असून, या गावांतून अमृत यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे यावेळी गवाणे या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असून, त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे.




