
रास्त भाव धान्य दुकानदारांचे चार महिन्यांचे कमिशन थकले
रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीतील रास्त भाव धान्य दुकानदार गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या कमिशनच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आहेत. अंदाजे १ ते १.२५ कोटी रुपयांचे कमिशन शासनाकडून अद्याप मिळालेले नाही, ज्यामुळे दुकानदारांचा घरखर्च, कर्मचार्यांचे वेतन, दुकानाचे भाडे तसेच इतर दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात १३४ रास्त भाव धान्य दुकाने आहेत, ज्यात अनेक सहकारी संस्था आणि बचतगटांचा समावेश आहे. हे दुकाने शासनाच्या सार्वजनिक वितरण
व्यवस्थेंतर्गत नागरिकांना धान्य नियमीत दरात पुरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मात्र, शासनाकडून कमिशनचे अनुदान न मिळाल्यामुळे दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आणि आर्थिक चिंता निर्माण झाली आहे. शासन शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य पुरवत असताना, दुक दुकानदारांचा घटक दुर्लक्षित केला जात आहे, ज्यामुळे व्यवस्थेत असंतोष आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दुकानदार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेकवेळा निवेदने देण्यात आली असून, संघटनांच्या वतीने कमिशन लवकरात लवकर भरण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या निधी उपलब्दता नसल्यामुळे फक्त आश्वासनांपुरते काम झाले असून, दुकानदार हवालदिल झाले आहेत.
www.konkantoday.com




