रत्नागिरी शहरात भर दुपारी शिवाजीनगर परिसरात नगर परिषदेच्या डंपरची दोन रिक्षांसह इलेक्ट्रिक खांबाला धडक


रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरातील उतारात रिलायन्स मॉल च्या कमानी जवळ नगर परिषदेच्या एका डंपरचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात घडला रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर परिसरात रिक्षा स्टॅन्डजवळ हा अपघात झाला, ज्यात दोन रिक्षांचे मोठे नुकसान झाले, तसेच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपरने दोन इलेक्ट्रिक खांबांनाही धडक दिली.

नगर परिषदेचा हा डंपर साळवी स्टॉपकडून मारुती मंदिराच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचा डंपर वरील ताबा सुटला झाले चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव डंपर थेट सिद्धिविनायक नगर येथील रिक्षा स्टॅन्डवर घुसला. दुपारची वेळ असल्याने या मार्गावर वाहतूक तशी कमी होती, मात्र रिक्षा स्टॅन्डवर नेहमीप्रमाणे रिक्षा उभ्या होत्या. सुदैवाने, या वेळी केवळ दोनच रिक्षा स्टॅन्डवर होत्या. डंपरच्या जोरदार धडकेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
रिक्षांना धडक दिल्यानंतरही डंपर थांबला नाही. त्याने पुढे सरकत रस्त्याच्या कडेचे दोन इलेक्ट्रिक खांब तोडले आणि साउथ इंडियन बँकेच्या गेटसमोर जाऊन तो धडकला. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी, रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या दिवाळी जवळ आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असून सुदैवाने हा अपघात झाला त्यावेळी विशेष रहदारी नव्हती विजेचे खांबाला धडक दिल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा काही तास खंडित झाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button