
रत्नागिरी जिल्ह्यात दररोज १० महिलांचा गर्भपात, आकडेवारी चिंताजनक
जिल्ह्यात वैधकीय गर्भपातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः गेल्या ८ महिन्यात त्याची आकडेवारी लक्षणीय वाढली आहे. जानेवारी ऑगस्ट दरम्यान २.३३८ महिलांचा गर्भपात झाला. दर दिवशी सरासरी १० महिला जिल्ह्यात सरकारी तसेच खासगी केंद्रांवर गर्भपात करून घेत असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाच्या नोंदीतून पुढे आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय गर्भपाताची आकडेवारी नियमितपणे गोळा करत असते. शासनमान्य खासगी आणि सरकारी केंद्रे अशा दोन प्रकारच्या गर्भपात केंद्रात सुरक्षित गर्भपाताची व्यवस्था केलेली जसते. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान सरकारी केंद्रांवर ९६ जणींचे गर्भपात नोंदवले गेले आहेत. त्याचवेळी खासगी केंद्रांवर २,२४२ महिलानी पर्मधात करून घेतले. दोन्ही मिळून २.३३८ एवढे गर्भपात नोंदवले गेले.
सरकारी गर्भपात केंद्रांवर केल्या जाणार्या गर्भपातांच्या जवळपास २२ पट एवढे खासगी केंद्राकडे काम आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर गर्भपात करून घेणार्या व्यक्तीची पुरेशी गोपनीयता बाळगली जाते. कोणत्याही परिस्थितीत संबंधित नसलेल्या लोकांकडे ही माहिती जाणार नाही याची काळजी घेतली जाते. तथापि सरकारी केंद्रात सुविधा घेतल्यास आपल्याविषयी माहिती परिचित लोकांपर्यंत जाईल, अशी भीती वाटत असल्याने खासगी केंद्रांकडे लोक वळत असल्याचे आरोग्य कर्मचार्यांनी सांगितले
www.konkantoday.com




