
महादेवा योजनेंतर्गत १३ वर्षांखालील फुटबॉल खेळाडू निवड चाचणी 31 ऑक्टोबर रोजी
रत्नागिरी, दि.17 ) : शासनाचा क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने “महादेवा” ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील १३ वर्षाखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तर निवड चाचणी ३१ ऑक्टोबर रोजी एस. व्ही.जी. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गणेश खैरमोडे, क्रीडा मार्गदर्शक (मो.क्र.९२८४३४२२१०) यांना संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
महादेवा योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉल मध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या निवड चाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना १४ डिसेंबर, २०२५ रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे
प्रवेश अर्ज, जन्मदाखला सत्यप्रत, आधारकार्ड सत्यप्रत व ०२ फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. वयोमर्यादा -खेळाडूचा जन्म ०१ डिसेंबर २०१२ नंतर व व ३१ डिसेंबर २०१३ पूर्वीचा असावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd7ZNKYQOHKFFRaiSym-QJi0jAf-9gaC-SxhABZAfxIXpGeMw/viewform?usp=header या लिंकवर अर्ज भरावा. निवड चाचणी दिवशी जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, जन्मप्रमाणपत्र) सत्यप्रती जोडाव्यात.




