
नापत्ता व्यक्तीबाबत निवेदन
रत्नागिरी, दि. १७. :- सुंदराबाई परशुराम जाधव वय ७० वर्षे या मंडणगड तालुक्यातील सडे येथून २ डिसेंबर २००६ पासून नापत्ता आहेत. सदर नापत्ता व्यक्ती घरामध्ये कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरात, गावामध्ये, नातेवाईकांकडे शोध घेवूनही त्या सापडल्या नाहीत. तरी ही व्यक्ती कोणाला आढळून आल्यास मंडणगड पोलीस ठाणे यांच्याकडे संपर्क साधावा.




