
चोरट्यांचा मोर्चा राजापुरात, चार घरे फोडली
चोरट्यांनी आपला मोर्चा आता राजापूरकडे वळविल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी रात्री नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार धनगरवाडी येथील तीन व कुंभवडे हरचेलीवाडी येथील दोन अशी पाच घरे फोडून चोरट्यांनी सुमारे ४० हजार रोकड व दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी असा सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल लांबवला आहे. एका भागात पाच बंद घरे फोडल्याने खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी सुहास भगवान मणचेकर (रा कुंभवडे हरचेलीवाडी) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये त्यांनी सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८. या कालावधीत बंद घराच्या दरवाजांच्या कुलुपांवर दगड टाकून ती कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत ही चोरी केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच कुंभवडे येथील वैशाली मयेकर व नाणार धनगरवाडी येथील गणपत वरक, प्रकाश वरक व अन्य एक अशा एकूण पाच जणांची बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत.
www.konkantoday.com




