
गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेच्या संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांचा राजापूर येथे अभ्यास दौरा
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली, शाखा हेदवी, शाखा शृंगारतळी येथील अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी यांचा राजापूर तालुक्यातील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित या पतपेढीत अभ्यास दौरा नुकताच उत्साहात झाला.
यावेळी राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या वतीने चेअरमन प्रकाश मांडवकर, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्थेच्या चेअरमन व सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करून उस्फूर्तपणे स्वागत केले. त्यानंतर पतसंस्थेचे संचालक प्रकाश मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव यांनी कर्ज देताना घ्यावयाची काळजी, कर्ज थकबाकी झाल्यावर कर्ज वसुली कशी करावी, कर्जदाराला, जामीनदारांना नोटीस किती वेळा द्याव्या, कर्ज देताना जामीनदार सक्षम आहेत की नाही याची काळजी घ्यावी, सोनेतारण आदी महत्त्वाच्या सर्व विविध विषयांवर मार्गदर्शन करून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या अभ्यास दौऱ्यातील संपूर्ण चर्चासत्रात मौलिक मार्गदर्शन मिळाल्याने राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांच्यासह संचालक, कर्मचारी यांना गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेच्या वतीने धन्यवाद देण्यात आले.
गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ संचालक पांडुरंग पाते, तज्ञ संचालक अनंत पागडे, संचालक महादेव वणे, संचालिका श्रीमती वनिता, वैभव बागवे, संतोष हुमणे, सुशील फडकले, सचिन भेकरे आदी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.




