
अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा
रत्नागिरी, दि. १७: :- सैनिक स्कूल सोसायटी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देशभरातील सैनिक शाळा/नवीन सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववी च्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (एआयएसएसईई)-२०२६ आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ वर ऑनलाईन अर्ज करावा. परीक्षा शुल्क गेटवे, डेबिट/कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग/यूपीआय वापरुन ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी एनटीए ईमेल आय डी aissee@nta.ac.in व एनटीए हेल्प डेस्कला ०११-४०७५९००० क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
परीक्षेची योजना/कालावधी/माध्यम/अभ्यासक्रम, पात्रता निकष, सैनिक शाळा/नवीन सैनिक शाळांची यादी आणि त्यांचे संभाव्य प्रवेश, जागांचे आरक्षण, परीक्षा शहरे, उत्तीर्ण होण्याच्या आवश्यकता, महत्वाच्या तारखा इत्यादी, परीक्षेची संबंधित माहिती https://nta.ac.in/ किंवा https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ वर होस्ट केलेल्या माहिती बुलेटीनमध्ये समाविष्ट आहेत. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्ज करण्यापूर्वी (एआयएसएसईई) -२०२६ साठी तपशिलवार माहिती बुलेटिन वाचावे.




