
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू ×उत्पादकांना पीकविम्याची प्रतीक्षा
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादन व रोजगार हमी योजनेतून लागवड योजना लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर आंबा, काजू या खरीप हंगामातील नगदी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फळधारणा होणार्या या फळपीक झाडांच्या हवामानावर आधारित विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक नुकसानीची झळ बसू नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो. मात्र नुकसानग्रस्त शेतकर्यांना सहा महिने झाले तरी कंपनीकडून विमा रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
वातावरणीय बदल, पाऊस याचा परिणाम होवून अनेक शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आंबा हंगामामध्ये ज्या बागायतदार शेतकर्यांनी फळपीक विमा काढलेला होता त्यांना विम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते. हंगाम संपून सहा महिने झाले तरीही विमा कंपनी आणि कृषि विभागाकडून नुकसानीची टक्केवारी वा माहिती देण्यात आलेली नाही. आता शेतकर्यांना पुढील हंगामासाठी खते, औषधे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी विमा रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com




