
रत्नागिरी जिल्ह्यातही गुन्हेगारी वाढू लागली लोट्याची घटना ताजी असतानाच आता चिपळूण मध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रकार उघड
रत्नागिरी जिल्ह्यातही गुन्हेगारी वाढू लागली लोट्याची विनयभंगाची घटना ताजी असतानाच आता चिपळूण मध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग होण्याच्या प्रकाराने खळबळ माजली आहे
संस्कारी शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळूण शहरात काल (१५ ऑक्टोबर) दुपारी घडलेल्या घटनेने पालकांच्यात चिंता वाढली आहे चिपळूणमधील एका खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार शहरालगतच्या रस्त्यावर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
चिपळूण पोलिसांनी आरोपी व्हॅन चालकाला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा चिपळूण शहरातीलच असल्याचे कळते दररोजप्रमाणे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी व्हॅनने घरी जात असताना चालकाने विश्वासघात करून अशोभनीय कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.




