
तेजस ठाकरे आणि त्यांच्या संशोधन पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी परिसरातील निमसदाहरित जंगलात केसाळ गोगलगायींच्या नवीन प्रजातीचा लावला शोध
पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या अभ्यासात आणखी एक मोलाची भर पडली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे आणि त्यांच्या संशोधन पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी परिसरातील निमसदाहरित जंगलात केसाळ गोगलगायींच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे सूक्ष्म प्रजातींच्या जैवविविधतेविषयी नव्या संशोधनाला दिशा मिळणार आहे.
या गोगलगायीच्या प्रजातीचे शास्त्रीय नामकरण प्रसिद्ध जपानी अॅनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या सन्मानार्थ ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे करण्यात आले आहे. मियाझाकी यांच्या चित्रपटांत निसर्गाशी असलेले नाते आणि पर्यावरणीय संतुलनाचे तत्त्व सुंदरपणे मांडले जाते. त्याच विचारांना सलाम म्हणून हे नामकरण करण्यात आले असल्याचे तेजस ठाकरे यांनी सांगितले.
या संशोधनाचा सविस्तर अहवाल ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे




