
ग्रामीण भागातील प्रत्येक बांधकाम कामगारांनी शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा — निखिल नवेले यांचे आवाहन
नवनिर्मिती सामाजिक संघटनेतर्फे बांधकाम कामगार संघटनेची स्थापना नोंदणीकृत बांधकामगारांपर्यंत सर्व योजना पोहोचवण्याचा निर्धार
ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निखिल नवेले यांनी केले आहे. शासनामार्फत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा, शिक्षणसाहाय्य, प्रसूती लाभ, निवृत्ती वेतन, आणि आर्थिक सहाय्य अशा अनेक योजना राबवल्या जातात.
निखिल नवेले यांनी सांगितले की, “अनेक बांधकाम कामगारांना या योजनांची माहिती नसल्याने ते वंचित राहतात. प्रत्येकाने नोंदणी करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
👉नवनिर्मिती सामाजिक संघटनेतर्फे बांधकाम कामगार संघटनेची स्थापना
नोंदणीकृत बांधकामगारांपर्यंत सर्व योजना पोहोचवण्याचा निर्धार
नवनिर्मिती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमाद्वारे बांधकाम व्यवसायाशी संबंधित सर्व कामगारांना शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या योजना — जसे की आरोग्य विमा, अपघात सहाय्य, शैक्षणिक लाभ, प्रसूती सहाय्य आणि निवृत्ती वेतन — यांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी नवनिर्मिती संघटना कटिबद्ध आहे.”
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यास आणि त्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळवून देण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बैठकीस संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, सचिव राजेश आंबेकर, ज्येष्ठ सदस्य सलाउद्दीन बोट आणि डॉक्टर सलीम सय्यद तसेच उपकमिटीचे अध्यक्ष दत्ताराम खातु, कार्याध्यक्ष जमूरत अलजी, सचिव मुजम्मिल काझी, सहसचिव कौस्तुभ धनावडे, खजिनदार ओंकार वीरकर , कार्यवाह अभिजीत किंजळे, उपाध्यक्ष सुहास किंजळे, निसार केळकर, अमोल वाडकर, अमोल पाटणे, यासीन सनगे, मनोज पांचाळ (जिजाऊ संस्था), संजय मापुस्कर, विजय चव्हाण, रवींद्र किंजळे, मनोहर शिवगण निलेश जाधव, रमेश मेस्त्री, सौ रुतुजा मेस्त्री, वसंत मेस्त्री, प्रवीण मापुस्कर, संतोष सांडीम, राजेश धामणे, राजेश रेवाळे, तैमुर अलजी, शांताराम भारती, साहिल गोरे, प्रदीप सोलकर आदी उपस्थित होते.




