
शीळधरण येथील वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड , गुरुवारी शहराला पाणीपुरवठा होणार नाही.
शीळधरण येथील वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रत्नागिरी शहरास होणारा पाणी पाणीपुरवठा खंडित झाला असून दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहील. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.




