
कोकण रेल्वे राबवत आहे “स्वच्छता हि सेवा 2025” अभियान.
रत्नागिरी:- कोकण रेल्वे सध्या ‘ स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवत आहे.या अंतर्गत कोकण रेल्वेच्या विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे.
देशाच्या रेल्वे बोर्डाने 2ऑक्टोबर पासून देशभरातील रेल्वे मार्ग व आस्थापनांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार कोकण रेल्वेच्या मार्गावरही विविध ठिकाणी स्वच्छता ही सेवा अभियान राबवले जात आहे.या अभियानांत कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.अभियानाची सुरवात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानक परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या साथीने प्रभात फेरी काढत स्वच्छतेची जागृती करत करण्यात आली.यानंतर कोकण रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवत परिसराची साफसफाई केली.या अभियाना अंतर्गतच सफाई कामगारांना मटेरियल किट पुरवणे,स्वच्छते बाबतची जागृती करणे याचा समावेश आहे.यावेळी कर्मचाऱ्यांसाठी चिपळूण आणि रत्नागिरी स्थानकात आरोग्य शिबिर राबवून त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या टप्प्यातच मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्यांची पॅन्ट्री, टॉयलेट आणि अंतर्गत भागाची साफसफाई करण्यात आली.पुढील काही दिवस चालणाऱ्या या अभियानात कोकण रेल्वेच्या विविध स्थानकातील स्टॉल्स ,वॉटर कुलर यांची अधिकची स्वच्छता केली जाणार आहे.या अभियानात सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होत आहेत.




