
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा
रत्नागिरी, दि. १५ ):- राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता दरे हेलिपॅड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ हेलिपॅड, जि. रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ११ वाजता रत्नागिरी विमानतळ हेलिपॅड, जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने तारांगण, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी ११.१५ वाजता “कोकणातील भारतरत्न शिल्प” लोकार्पण सोहळा (स्थळ : तारांगण, जि. रत्नागिरी) दुपारी १२ वाजता मोटारीने शिवसेना कार्यालय, आठवडा बाजार, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्र उद्घाटन सोहळा (स्थळ :- शिवसेना कार्यालय, आठवडा बाजार, जि. रत्नागिरी) दुपारी १२.२५ वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा बैठक (स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, जि. रत्नागिरी) दुपारी १.२५ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता राखीव (स्थळ :- शासकीय विश्रामगृह, जि. रत्नागिरी) दुपारी २ वाजता मोटारीने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी २.१५ वाजता शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा (स्थळ :- स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, जि. रत्नागिरी) दुपारी ३ वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळ हेलिपॅड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी ३.१५ वाजता रत्नागिरी विमानतळ हेलिपॅड, जि. रत्नागिरी येथे आगमन व हेलिकॉप्टरने दरे हेलिपॅड, ता. महाबळेश्वर, जि. साताराकडे प्रयाण




