
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संस्थास्तरीय समुपदेशन फेरी16 ऑक्टोबरपर्यंत संस्थेत सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर रहा
रत्नागिरी, दि. 14 ) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, नाचणे रोड येथील आय.टी.आय. प्रवेशाच्या समुपदेशन फेरी नंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आयोजित करण्यात आलेली आहे. या फेरीसाठी पात्र उमेदवारांनी दि. 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत संस्थेत सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर रहावे, असे संस्थेच्या प्राचार्यानी कळविले आहे.
या फेरी करता यापूर्वी ज्यांनी आय.टी.आय. रत्नागिरी येथे अर्ज भरलेले आहेत व कोणत्याही व्यवसायात प्रवेश घेतलेला नाही, त्याच प्रमाणे ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत त्याच्याकरिता दि. 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे सर्व उमेदवार समुपदेशन फेरीकरीता पात्र असतील, आय टी.आय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे
13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत दररोज उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराने व्यक्तिशः संपूर्ण मुळ कागदपत्रे, सर्व छायांकीत, आधार कार्ड, अलिकडील पासपोर्ट साईज फोटो व प्रशिक्षण शुल्कासहित (संकेतस्थळावर वर दिलेल्या शुल्कानुसार) उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश फेरी करता उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार व प्रवेशा करता उपलब्ध जागा नुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी चे गटनिदेशक सी.आर.शिंदे, मो.क्र.9967775317, गटनिदेशक पी.जी. कांबळे 9423876883, शिल्पनिदेशक एस.जे. पावसकर मो.क्र.8421979663 यांच्याशी संपर्क साधावा.
000




