
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा अतिवृष्टीमुळे लांबलेला ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम सोमवार दि.१३/१०/२०२५ रोजी संपन्न झाला.

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ दरवर्षी १ ऑक्टोबर ला ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतो. या वर्षीचा कार्यक्रम अतिवृष्टीच्या ईशाऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता. संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम सोमवार दि १३ ऑक्टोबर २०२५ रोजी संघाच्या शिवाजीनगर येथील सभागृहात साजरा करण्यात आला. मान्यवारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.श्री प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी आणि श्री दीपक घाटे सहा. आयुक्त समाज कल्याण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी वयाची ९५, ९०, ८५, ८० व ७५ वर्षे पूर्ण केलेल्या तसेच वैवाहिक सहजिवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा शाल व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच सप्टेंबर,२०२५ मधील सामूहिक वाढदिवस कार्यक्रम साजरा करताना संबंधित सभासदांचाही भेट वस्तू व शुभेच्या पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
संघांचे माजी अध्यक्ष डॉ श्रीरंग कद्रेकर यांचा ज्येष्ठतम ९५ वर्षाचा टप्पा ओलांडल्याबद्दल सर्व प्रथम सत्कार करण्यात आला.
श्री प्रशांत सातपुते यांनी कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठiची उत्साही उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले. या हृद्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्याला लाभल्या बद्दल सर्व उपस्थित ज्येष्ठiचे आणि संयोजक संघांचे आभार मानले. श्री दीपक घाटे सहा. आयुक्त समाज कल्याण यांनी संघ राबवित असलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. संघांचे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ, जिल्हा ज्येष्ठ नागरिक सवर्धन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रशासनाकडे प्रलंबित असलेले विविध प्रश्न हिरीरीने मांडत असतात आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा समन्वय अधिकारी म्हणून सातत्याने माझ्या संपर्कात असतात असे सांगितले.
ज्येष्ठ नागरिक संघाना शासकीय भूखंड देणे, नगर परिषद आणि नगर पंचायतीनी स्वमालकीच्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्य विरंगुळा केंद्र निर्माण करणे, मा. मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेल्या आणि ज्यासाठी मा. पोलीस महानिरीक्षक यांनी आदेश दिलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानाकात त्या स्थानकाच्या कार्यकक्षेतील ज्येष्ठ नागरिक संघातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करणे असे सर्वच प्रश्न प्रलंबित असल्याचे संघांचे अध्यक्षांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या प्रसंगी अनेक सत्कार मूर्तिनी संघाला देणगी दिली. श्रीमती पद्मजा बापट यांनी आभार मानले.
सामूहिक पसायदान झालेनंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.




