
गेले काही दिवस रखडलेला वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश अखेरीस झाला, खेडमध्ये रामदास कदम यांना रोखण्यात भाजप यशस्वी होणार
गेले काही दिवस रखडलेला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश अखेर आज संपन्न झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी गुहागरचे माजी आमदार विनय नातू आदी पक्षातील नेते उपस्थित होते खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोन वेळा झाला नव्हता मोठा लवाजमा घेऊन मुंबईत गेलेल्या खेडेकर यांना सात प्रवेश न करताच परतावे लागले होते त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या होत्या त्यांचा भाजपचा प्रवेश खुद्द राज ठाकरे यांनी रोखल्याचे बोलले जात होते राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले असल्यामुळे या चर्चेला उत आला होता
मनसेतून हकालपट्टी झाल्यावर खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, मात्र, काही कारणास्तव हा पक्ष प्रवेश पुढे जात होता
आज अखेर खेडेकर यांनी भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे वर्चस्व आहे खेड सारख्या ठिकाणी रामदास कदम यांचे वर्चस्व आहे खेडेकर हे रामदास कदम यांचे राजकीय वैरी समजले जातात खेडेकर यांच्या प्रवेशामुळे रामदास कदम व योगेश कदम यांना रोखण्यात भाजप यशस्वी होईल असा अंदाज आहे भाजप सेना युती असल्याने आता खेडेकर व रामदास कदम हे जुळवून घेतात का हे पाहावे लागेल




