एक लाख रुपयाच्या मागणीसाठी सख्या मुलाने केले ८० वर्षाच्या वडिलांचे अपहरण, तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या.


पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे आता सख्या मुलाने आपल्या 80 वर्षाच्या वडिलांचे अपहरण करून त्यांना बांधून ठेवून त्यांच्याकडून एक लाख रुपयाची मागणी करून खंडणी मागण्याचा प्रकार उघड झाला आहे या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे
संगमेश्वरतालुक्यात ही ही थरारक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या आरोपी मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. . ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. आरोपी मुलाने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपहरण केले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरप-या, ता. संगमेश्वर) असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांना पैशासाठी मानेवर सुरा ठेवून पळवून नेले आणि नंतर व्हॉटसॲपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

सुनीता मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार,सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने सोमवारी रात्री ११ वाजता घरातच हा प्रकार घडला आई आणि मुलीसमोर सुराने वडिलांच्या मानेवर धाक दाखवत, “आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो” अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला.
पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला. त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला.श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास “मी आता मागे हटणार नाही” अशी धमकी दिली
या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी मुलाविरुद्ध तक्रार करण्याचे धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. सध्या देवरूख पोलीस पुढील तपास करत असून, आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button