अज्ञात डंपरची विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक ,दोन जण जखमी


रत्नागिरी शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थी रियान सावकार व रिक्षा चालक जाहीदअली अब्दुलरहिम धामस्कर (वय ५०, रा. मजगाव, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास मजगाव-कदमवाडी रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक जाहिदअली धामस्कर हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ७१६८) मधून विद्यार्थी शोएब सावकार, रियान सावकार, महमद पेवेकर यांना शहरातील मिस्त्री हायस्कूल येथून बसवून रत्नागिरी ते मजगाव असे जात असताना कदमवाडी-मजगाव येथे आले असता मजगावहून रत्नागिरी येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा चालक जाहीदअल्ली धामस्कर व रियान सावकार हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button