
संगमेश्वर पंचायत समिती १४ गणांचे आरक्षण जाहीर
संगमेश्वर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संगमेश्वर पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षण जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. १४ पैकी ७ जागा महिलांसाठी जाहीर झाल्या आहेत.
संगमेश्वर पंचायत समितीसाठीचे आरक्षण असे – धामापूर तर्फे संगमेश्वर : सर्वसाधारण, आरवली : सर्वसाधारण स्त्री. कडवई :- सर्वसाधारण स्त्री, धामणी :- सर्वसाधारण, कसबा :- ना मागास प्रवर्ग (पुरुष), परचुरी :- सर्वसाधारण स्त्री, माभळे : सर्वसाधारण, मुचरी : ना मा प्रवर्ग (स्त्री), कोसुंब : ना मा प्र (स्त्री), ८८ निवे बु. : सर्वसाधारण, साडवली : सर्वसाधारण स्त्री, हातीव : सर्वसाधारण, दाभोळे : अनु. जाती स्त्री (SC), कोंडगाव : सर्वसाधारण.




