
लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या आरोपीची जामीनावर मुक्तता
लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरिरसंबंध ठेवून फसवणुक करणाऱया संशयिताची रत्नागिरी सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी. शादाब शौकत गोलंदाज (35, ऱा मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली होत़ी शादाब याने याप्रकरणी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होत़ा.
गुह्यातील माहितीनुसार, पिडीता 28 वर्षीय घटस्फोटीत महिला आह़े एप्रिल 2024 मध्ये तिने एक एअर कंडिशनर खरेदी केला. यावेळी आरोपी तिच्या घरी ए.सी. बसवण्यासाठी आला. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल़े दोघं विविध ठिकाणी एकत्र राहू लागले. त्या काळात आरोपीने वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर आरोपीचा स्वभाव बदलला आणि तो तिला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ व मारहाण करू लागला. 2024 मध्ये गणपती उत्सवाच्या दरम्यान आरोपीने पिडीतेला मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी तिच्या माहेरी गेली आणि तिने घडलेल्या प्रकारांची माहिती आई-वडिलांना दिली.
काही दिवसांनी आरोपीने तिला भेटून पुन्हा लग्नाचे आश्वासन दिले व तिला परत घेऊन गेला. मात्र, पुन्हा त्याने विवाह टाळला. जेव्हा तिने त्याला सांगितले की तो जर लग्न करत नसेल तर ती माहेरी जाईल, त्यावेळी आरोपीने धमकी दिली की, ‘जर तू तुझ्या आई-वडिलांच्या घरी गेलीस, तर मी रक्ताचे सडे पाडीन’ त्यानंतरही आरोपी तिला मारहाण करू लागला. 11 सप्टेंबर 2025 रोजी ती माहेरी परत गेली आणि आईवडिलांना आरोपीकडून होणाऱया त्रासाची माहिती दिली. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आरोपी पुन्हा पिडीतेच्या घरी आला. त्यामुळे तिला आपल्याला इजा होण्याची किंवा जीवितास धोका होण्याची भीती वाटली, म्हणून तिने शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी




