
भरणेत घरात घुसलेल्या सापाला जीवदान
खेड शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथील स्वयंपाक घरात भला मोठा साप घुसल्याचे निदर्शनास येताच भवनचे मुख्य बळीराम शिंदे यांनी तातडीने भरणेतील सर्पमित्र अथर्व मगदूम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून सापास सुखरूपरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
हा साप धामण जातीचा बिनविषारी होता. उंदीर पकडण्यासाठी तो अडगळीच्या ठिकाणी येत असतो. त्यानुसार तो येथे आला असावा, असे सर्पमित्र मगदुम यांनी सांगितले.www.konkantoday.com




