
शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला देय असलेल्या निधीचा दुसरा टप्पा जारी केल्याने रत्नागिरीतील ठेकेदाराची दिवाळी गोड जाणार
शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला देय असलेल्या निधीचा दुसरा टप्पा जारी करून जिल्ह्यातील ठेकेदारांसाठी सुमारे ८० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीमुळे रस्ते आणि पूल बांधकामाचे प्रलंबित देयक मिळण्यास ठेकेदारांना मोठा फायदा होणार असून, जिल्ह्यातील १२० ठेकेदारांची दिवाळी गोड होणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अव्वल ’सचिवांनी (उपसचिव) काढलेल्या आदेशानुसार, प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने वितरित केली जातील. पहिल्या टप्प्यात २०२४-२५ किंवा त्यापूर्वीची ५० लाख रुपयांपर्यंतची देयके असलेल्या कंत्राटदारांना प्रथमतः देयक दिले गेले होते. यामध्ये मजूर सहकारी संघटना, सुशिक्षित बेरोजगार संघटना आणि खुले कंत्राटदार यांचा समावेश होता. दुसर्या टप्प्यात ५० लाख ते १ कोटी रुपयांची प्रलंबित देयके असलेल्या ठेकेदारांना प्राधान्याने निधी दिला जाईल.
रत्नागिरी जिल्ह्यात ठेकेदारांची एकूण ३७५ कोटी रुपयांची देणी प्रलंबित होती, यामध्ये पहिल्या टप्यात ४३ कोटी रुपये वितरित केले गेले, तर आता दुसर्या टप्प्यात ८० कोटी रुपये उपलब्ध के ले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग लवकरच या मार्गदर्शक सूचनांनुसार निधी वितरित करणार आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या कामांची देयके मिळणार आहेत, आणि ठेकेदारांची दिवाळी आनंदात जाईल.
www.konkantoday.com




