
चिपळूण शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख मधुकर मते यांची पक्षाला सोडचिठ्ठी
नगर पालिका निवडणुका तोंडावर असतानाच चिपळूण येथील शिवसेना शिंदे गटाचे उपशरप्रमुख मधुकर हरी मते यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्याने चिपळूण शहरात खळबळ उडाली आहे. रावतळे, मतेवाडी, ओझरवाडी, पाग भागासह शहरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
गेली वीस ते पंचवीस वर्षे मधुकर मते हे शिवसेना पक्षातं कार्यरत होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहून त्यांच्यावर शिंदे गटात उपशहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती




