
अशा राजकारणामुळे मी विचलित होणार नाही-योगेश कदम
राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहाणार असल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. शेवटी असंच म्हणावं वाटतं की, छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही असे कदम म्हणाले. दुसर्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखिल या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेल्याचा उल्लेख त्यांनी केला.www.konkantoday.com




