
संगमेश्वर-पाटण घाटमार्गाला नवी गती मिळणार, अप्पर मुख्य सचिवांच्या सूचना
संगमेश्वर- पाटण घाटमार्गाचे काम गतीमान करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. या कामाला प्राधान्याने गती द्यावी, अशा तातडीच्या सूचना अपर मुख्य सचिव (सा. बां.) मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी सचिव (रस्ते) संजय दशपुते यांना दिल्या आहेत.
दि. १ ऑक्टोबर रोजी बाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी मंत्रालयात अपर मुख्य सचिवांची भेट घेऊन घाटमार्ग प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली. होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने संबंधित प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
www.konkantoday.com




