
संगमेश्वर तालुक्यातील कडवई खूनातील संशयित महिलेला जामीन
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महिलेच्या खुनातील संशयित आरोपीची सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. हाजिरा मुसा माखजनकर (७२, रा. कडवई, ता. संगमेश्वर) असे संशयित महिलेचे नाव आहे. तिच्यावर कडवई येथील बानू फकीर मोहम्मद जुवळे (रा. कडवई ता. संगमेश्वर) हिचा खून केल्याचा गुन्हा संगमेश्वर पोलिसात दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून हाजिरा हिला अटक करण्यात आली होती.
गुन्ह्यातील माहितीनुसार हाजिरा मुसा माखजनकर, रिजवान महामुद जुवळे व हुमायु थकील काझी (रा. संगमेश्वर) या तिघा संशयितांनी बानू जुवळे यांचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. २ मे रोजी बानू यांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी त्यांच्या चारचाकी वाहनातून अपहरण करून जुवळे यांचा खून केला.www.konkantoday.com




