
वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला तीन दिवसीय संप शुक्रवारी मागे
वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला तीन दिवसीय संप शुक्रवारी मागे घेतला. या संपात जिल्ह्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. संपाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने केली. सायंकाळी संप मागे घेण्याची घोषणा होताच रत्नागिरीत देखील कर्मचाऱ्यांनी बंद मागे घेतला.
खाजगीकरण व पुनर्रचनेसह संयुक्त कृती समितीच्या इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. हा संप टाळण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थापनाने वेळोवेळी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. मात्र सर्वच मागण्यांशी पूरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करूनही संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला होता. संपामध्ये ३७१ कर्मचारी सामिल झाले होते. संपाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालया बाहेर निदर्शने केली. मात्र संप मागे घेण्याची घोषणा होताच रत्नागिरी देखील कर्मचारी कामावर रुजू झाले.




