
लोटे औद्योगिक वसाहतीमधील योजना ऑरगॅनिक्समध्ये कामगार भाजून जखमी..
लोटे औद्योगिक वसाहतीमधील योजना ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री एक कामगार भाजून जखमी झाल्याची घटना घडली असून या कामगाराला कारखाना व्यवस्थापनाने तत्काळ दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. मात्र औद्योगिक सुरक्षा विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन किंवा अन्य संबंधित यंत्रणांना कोणत्याही प्रकारे कळविले नाही.
रविवारी रात्रीच्या सुमारास योजना ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये प्रवीण काजवे, वय सुमारे ४५ वर्षे हा कामगार ग्राइंडरने नटबोल्ट कापण्याचे काम करत होता. त्या ग्राइंडरच्या ठिणग्या उडाल्यावर आगीचा भडका झाला – आणि त्यामुळे त्या कामगाराचे हात, पाय आणि चेहरा होरपळला. यानंतर कारखाना व्यवस्थापनाने त्याला तातडीने नजीकच्या साईकृपा रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक
उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना भाजलेल्या पेशंट वर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याला अन्यत्र हलवावे असा सल्ला दिला. म्हणून त्याला तातडीने लाईफ के अर हॉस्पिटल चिपळूण येथे हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू झाले.www.konkantoday.com




