
राजापूर तालुक्यातील कातळी सडा येथील चोरीस गेलेले तब्बल १,४७,२०० रुपये किमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे १२ तासांत हस्तगत करण्यात नाटे सागरी पोलिसांना यश
राजापूर तालुक्यातील कातळी सडा येथील चोरीस गेलेले तब्बल १,४७,२०० रुपये किमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे १२ तासांत हस्तगत करण्यात नाटे सागरी पोलिसांना यश आले आहे. या चोरीत सहभागी असलेल्या दोन आरोपींना पाेलिसांनी अटक केली आहे.मुबिन अब्दुल सत्तार सोलकर (वय ३०, रा. धालवली-मुस्लिमवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), समीर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी, ता. राजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत नासीर इसहाक मजगावकर (४७, रा. कातळी, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर रजनीकांत कुश्ये (रा. मेढा, ता. मालवण) यांच्या मालकीचे पर्सनेट मच्छिमारी जाळे त्यांनी दुरुस्तीसाठी आणून कातळी सडा येथील शब्बीर नाखेरकर यांच्या कंपाउंडमध्ये १८ जूनला काळ्या ताडपत्रीने झाकून ठेवले होते.
मात्र, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी तपासणी केली असता जाळीला लावलेले सुमारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाटे सागरी पोलिस स्थानकात ८ ऑक्टाेबर राेजी फिर्याद देताच पाेलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. पाेलिसांनी मुबिन अब्दुल सत्तार सोलकर आणि समीर कुदबुद्दिन सोलकर या दाेघांना अटक केली आहे.




