
मी अविश्वास ठराव जिंकलो : सरपंच अतुल लांजेकर यांची स्पष्टोक्ती
“एक महिना झाला माझे विरोधक माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करीत होते आणि त्यांनी आमचे सदस्य फोडले व अविश्वास ठराव दाखल केला. सगळीकडे त्यांनी बोंबाबोंब चालू केली होती आणि आमच्या सदस्यांना कोणती ही कल्पना नसताना ते तिथे घेऊन जाऊन अविश्वास ठरावावर, प्रस्तावावर सह्या घेतल्या होत्या; पण जेव्हा अविश्वास ठरावाची बैठक झाली. सहा तारखेला त्याची सभा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेव्हा अविश्वास ठराव, विश्वासदर्शक करून मी पूर्णपणे जिंकलो आहे,” अशी स्पष्टोक्ती झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ते म्हणाले की, “आमच्या सरपंचांनी जी – जी विकासकामे केलेली आहेत, ती सर्व आम्हाला पूर्णपणे माहिती आहेत. आमचा सरपंचांवर पूर्णपणे विश्वास आहे, असे माझ्या सदस्यांनी ठामपणे सांगितल्यामुळे मी अविश्वास ठराव पूर्णपणे जिंकलो आहे आणि विरोधकांनी जे माझ्यावर आरोप केलेले आहेत. ते सर्व आरोप निष्फळ ठरले आहेत. मी निष्पापपणे यातून बाहेर पडलो आहे आणि यापुढे कुणालाही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीला अर्ज करून माहिती घ्यावी.”
“ज्यांना शंका असेल त्यांनी आधी ग्रामपंचायतीत चौकशी करा आणि नंतर आरोप करा हेच आमचे सगळ्यांचे म्हणणे होते आणि सगळ्या माझ्या सदस्यांना, गावकऱ्यांनाही मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की, त्यांनी मला ग्रामपंचायतीत विश्वासाने काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो,” असे सरपंच अतुल लांजेकर यांनी सांगितले.



