चिपळूण नगर पालिकेची मालमत्ता थकीत असणार्‍या थकबाकीदारांना अभय योजनेचा लाभ मिळणार


वर्षानुवर्ष मालमत्ता कर न भरणार्‍या नागरिकांसाठी शासनाने आता अभय योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांच्या व्याजाची रक्कम माफ केली जाणार आहे. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करणे बंधनकारक आहे. चिपळूण शहराचा विचार करता येथे १,३१५ जण अनेक वर्षे थकितदार असून त्यांची ही रक्कम १६ कोटी ८९ लाख ८० हजार २०३ रुपये आहे. व्याजाची रक्कम ५ कोटी ९७ लाख ५८ हजार ६७४ रुपये आहे. त्यामुळे व्याज माफ करुन घेण्यासाठी १० ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
शासनाचा मालमत्ता कर थकवणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसते. त्यामुळे वसुली जास्त व्हावी, यासाठी शासनस्तरावरुन प्रशासनाला कायम सूचना दिल्या जातात. एवढेच नव्हे तर काही वर्षांपासून वसुली करा अन्यथा निधी मिळणार नाही, अशी भूमिका. शासनाने घेतली आहे. यामुळे जरी सर्वत्र वसुलीचा टक्का वाढला असला तरी थकितदारांची संख्या तितकीशी कमी झालेली नाही. त्यामुळे त्यांचा थकित कर वसूल व्हावा, यासाठी शासनाने ३० एप्रिल रोजी करावरील व्याज माफ करणारी अभय योजना आणण्याचा निर्णय घेतला. तसे परिपत्रक मे महिन्यात काढण्यात आले व आता त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button