
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
रत्नागिरी, दि. ११ ):- राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता राजभवन हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मंडणगड येथील हेलिपॅड, मंडणगड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी १०.४५ वाजता मंडणगड येथील हेलिपॅड, जि. रत्नागिरी येथे आगमन मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता मंडणगड, जि. रत्नागिरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन (स्थळ :- मंडणगड, जि. रत्नागिरी) दुपारी १२.३० वाजता मोटारीने मंडणगड येथील हेलिपॅड, मंडणगड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता मंडणगड येथील हेलिपॅड, जि. रत्नागिरी येथे आगमन व हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण.




