
सरकारने मराठ्यांच्या काढलेल्या जीआरला विरोध करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो कुणबी बांधव मुंबईच्या दिशेने
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने काढलेल्या जीआरचा निषेध करण्यासाठी आणि मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करू नये, ओबीसी प्रवर्गाही जातनिहाय जनगणना व्हावी आणि आरक्षण बचावासाठी मुंबईत ९ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावरती कुणबी एल्गार आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईच्या दिशेने उद्या रवाना होणार आहेत. संपूर्ण महामार्गावरती सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथील कुणबी बांधवांच्या गाड्यांचा ताफा दिसणार आहे.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांनी पुकारलेल्या कुणबी एल्गार आंदोलनासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव आझाद मैदानावरती आपल्या हक्क अधिकार्यांसाठी आंदोलन करणार आहेत.
www.konkantoday.com




