
विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. विक्रांत जाधव यांची निवड पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केली.
या निवडीनंतर विक्रांत जाधव चिपळूण येथील संपर्क कार्यालयात दाखल झाल्यावर त्यांच्या वडिलांनी – शिवसेना नेते आणि आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
या वेळी चिपळूण, गुहागर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. कार्यालय परिसरात “शिवसेना जिंदाबाद”च्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यकर्त्यांनी विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा आणखी उंच फडकविण्याचा निर्धार व्यक्त करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.




