
माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी नोटीस बजावल्याने चिपळुणातील मच्छी-मटण मार्केटची लिलाव प्रक्रिया सापडणार वादात
चिपळूण शहरातील नदीपात्रालगत उभारण्यात आलेले मटण-मासळी मार्केट पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी या मार्केटच्या गाळ्यांचा लिलाव करण्याच्या नगर परिषदेच्या हालचालींवर आक्षेप घेत नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही नोटीस चिपळुणातील प्रसिध्द वकील ऍड. विक्रांत वाडकर यांच्यामार्फत दिली आहे. त्यांच्या या नोटिसीमुळे मच्छी-मटण मार्केटमधील गाळ्यांची लिलाव प्रक्रियाही अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, नगर पालिका प्रशासन या नोटिसीला आता काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com




