
देवरुख शहरातील सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणातील आरोपींची संख्या बारा
देवरुख शहरातील सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणातील आरोपींची संख्या १२ असल्याचे निश्चित झाले आहे. ७ आरोपींना पकडण्यात देवरुख पोलिसांना यश आहे. अजूनही ५ आरोपी मोकाट असल्याचे स्पष्ट होत आहे.
केतकर हे साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत असताना वांझोळे दरम्यान त्यांचे अपहरण झाले. त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम घेऊन अज्ञातांनी वाटूळ येथे सोडले होते. केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पावधीतच देवरुख पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीचा पर्दाफाश केला.
आत्तापर्यंत ७ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्वजणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील दोन स्थानिक तरुणांनी बदलापूर येथील तरुणांना हाताशी धरून केतकर यांचे अपहरण केल्याची बाब उघड झाली आहे. तपासाअंती यातील आरोपींची संख्या १२ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ मोकाट असलेल्या आरोपींच्या घरी देवरुख पोलीस पोहोचले मात्र आरोपी आढळून आले नाहीत. या आरोपींना ताब्यात घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे.www.konkantoday.com




