सातारा, मालवण, संगमेश्वर येथील ऐतिहासिक स्थळांचा संवर्धन व पुनर्विकास. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मार्गदर्शन

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात आज झालेल्या बैठकीत सातारा, मालवण आणि संगमेश्वर येथील ऐतिहासिक व स्मारक स्थळांच्या पुनर्विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली.

संगम माहुली, सातारा येथे महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धार तसेच परिसराचा सुशोभीकरण याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. याचप्रमाणे, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या परिसराचा विकास करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले की, या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना त्यांचा मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावे, पुढील शंभर वर्षे टिकेल अशी वास्तू उभारावी, पुरेसे वृक्षारोपण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेऊन नियोजन करावे. भविष्यातील देखभाल व दुरुस्तीची तरतूद देखील आतापासून करावी, असे सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबतही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सुधारणा व सूचना दिल्या गेल्या.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसचिव नंदा राऊत, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध ठरेल, तसेच पर्यटकांसाठी आकर्षक आणि टिकाऊ बनवण्याचे उद्दीष्ट साधले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button