
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे श्री. सुबोधकुमार (आय.ए.एस.) यांची भेट

रत्नागिरी :
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी श्री. सुबोधकुमार (आय.ए.एस.) यांनी भेट दिली. महाराष्ट्र शासनाचे सिडको ने कोकणातील समुद्रकिनारी भागाकरिता विकास प्रकल्प आयोजनाकरिता ‘विशेष नियोजन अधिकारी’ म्हणून श्री. सुबोधकुमार (आय.ए.एस.) यांची नियुक्ती केली आहे. श्री. सुबोधकुमार हे मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त तसेच प्रधान सचिव (वित्त), विक्रिकर आयुक्त, केंद्रीय खादी सचिव, अशी विविध पडे भूषविली आहेत.
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या कोंकण विभागासाठी योग्य आणि शाश्वत विकास, स्थानिकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि व्यापक नियोजन सुनिच्छित करणे असे त्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे सिडको प्राधिकरणला विकास प्रकल्प करिता व्हिजन डॉक्युमेंटलाअंतिम रूप देण्याकरिता महाराष्ट्र शासन द्वारे श्री. सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तर सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. याच उद्देशाने कोकणातील फळबागायत, मत्स्य व्यवसाय यांचा अभ्यास करण्याकरिता सदर दौरा आखण्यात आला. यावेळी त्यांचेसोबत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत सुद्धा उपस्थित होते.

यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी ‘मत्स्यालय आणि मत्स्य-संग्रहालय’ पहाणी केली. सुबोध कुमार सर ह्यांनी मत्स्यालय मध्ये ठेवलेले विविध प्रकारचे मासे पहावयास मिळाल्याने समाधान व्यक्त केले आणि सदर मत्स्यालय पर्यटक आणि विद्यार्थी यांकरिता उत्तम पर्यटन स्थळ असल्याचे नमूद केले.
सदर भेटी दरम्यान सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर (प्राध्यापक), डॉ. हरीश धमगाये (अभिरक्षक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. वर्षा सदावर्ते व श्रीम. अपुर्वा सावंत (जीवशास्त्रज्ञ), श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक), श्री. तांबे (कार्यालय अधीक्षक) उपस्थित होते.



