
चिपळूण महामार्ग विभागाने थकीत दंड वसुली मोहिमेत ८८ हजारांची वसुली
चिपळूण येथे महामार्ग पोलीस विभागाच्या विशेष थकित दंड वसुली मोहिमेत वाहन मालकांकडून तब्बल ८८ हजार ७०० रुपये वसूल करण्यात आले. ही मोहीम अतिरिक्त कार्यभारांतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.या मोहिमेंतर्गत चैलसिंग परमार (रा. एमआयडीसी लोटे लेवा केमिकल कंपनी) यांच्या मालकीची वाहने (एमएच ०८ एएल ५३३३, एमएच ०८ एएक्स ५३३३ व एमएच ०८ एएक्स ७००७) या वाहनांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यातील थकीत दंड रक्कम वसूल करण्यात आली आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गादर्शनाखाली चिपळूण वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ आव्हाड आणि बाबूराव खोंदल यांनी केली.पोलिसांनी या मोहिमेद्वारे नियम भंग करणार्या वाहन मालकांना जागरूक करत कायद्याची आठवण करून दिली आणि थकित दंड वसुलीसह वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.www.konkantoday.com




