
चिपळुणातील बौद्धवाडीचे दोन प्रभागात विभाजन केल्याने बौद्ध समाजातील बांधव नगर पालिकेवर धडकले
चिपळूण येथील नगर परिषदेच्या हद्दीतील हायवे लगतच्या बौद्धवाडीतील मतदारांचे प्रभाग क्र. १३ व १४ मध्ये विभाजन केल्याने स्थानिक बौद्ध समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. संतप्त बौद्ध समाजातील बांधव-भगिनींनी सोमवारी थेट नगर पालिकेवर धडक देत अधिकार्यांना जाब विचारला. या निर्णयामुळे बौद्ध समाजावर जाणुन बुजून अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत यासंदर्भात नगर पालिकेने तातडीने निर्णय घेवून वाडीतील मतदार एका प्रभागात समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, आपल्या मागणीची दखल न घेतल्यास आगामी नगर पालिका निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
www.konkantoday.com




