
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्दमतदार यादीबाबत मतदारांना हरकत अगर सूचना असल्यास 14 ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात पुराव्यासह दाखल कराव्यात
रत्नागिरी, दि. 8 ) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय प्रारुप मतदार याद्या 8 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहे. मतदार यादीबाबत मतदारांना हरकत अगर सूचना असल्यास दि. 14 ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात पुराव्यासह दाखल कराव्यात, असे आवाहन खेडचे तहसिलदार सुधीर सोनवणे यांनी आवाहन केले आहे.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय मतदार यादी दिनांक 08 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत तहसिलदार कार्यालय, खेड व पंचायत समिती कार्यालय, खेड येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन ठेवण्यात आलेल्या आहेत.
मतदार यादीबाबत मतदारांना हरकत अगर सूचना असल्यास दि. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मा. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दिनांक 16 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसार निश्चित करुन देण्यात आलेल्या विहीत नमुन्यात आवश्यक पुराव्यासह तहसिलदार कार्यालय, खेड येथे दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
000




