
भगवतीनगर शाळेत HPV लसीकरण उपक्रम – पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळा निवेंडी खालची भगवतीनगर येथे HPV लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी HPV लस देण्यात आली.
कार्यक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लसीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे महत्व, सुरक्षितता आणि भविष्यातील आरोग्य फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी मालगुंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल पणकुटे, आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर, आरोग्य सहाय्ययिका श्रीम सीमा पाडवी, cho श्रीम. अक्षता शिर्षेकर, आरोग्य सेविका श्रीम दीपा गावडे आरोग्य सेवक श्री. सुरेश अंबुरे आशा व अंगणवाडी सेविका, तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 👏




