रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष,डॉ. अनिल जोशी यांचे दुःखद निधन


रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, खरेदी-विक्री संघाचे संचालक, तसेच गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल जोशी (वय अंदाजे ७०) यांचे शनिवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्यावर रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, त्यांच्या मूळगावी नरवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नरवण सारख्या दुर्गम भागात सुसज्ज रुग्णालय उभारणारे, नारळ आणि आंबा बागायतदार, आणि प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी नारळ विकासासाठी संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेले अनेक उपक्रम राबवले. रोटरी क्लब ऑफ गुहागरचे २००७ मधील अध्यक्षपद भूषवताना आरोग्य शिबिर, मोफत जयपूर फूट वाटप, रक्तगट तपासणी, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व व्याख्यानमाला असे अनेक उपक्रम राबवले.

नारळ उत्पादकांसाठी गट स्थापन, प्रशिक्षण वर्ग, संशोधकांचे मार्गदर्शन, औषधे व खते पुरवठा, तसेच प्रक्रियायुक्त उद्योगांच्या माध्यमातून तालुकास्तरावर रोजगार निर्मितीसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.

गावातील रस्ते, वीज, आणि ग्रंथालय उभारणीसारख्या विकासकामांमध्येही त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या निधनाने गुहागर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याने एक समर्पित सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आणि शेतकरी नेते गमावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button