
बेळगाव येथे 19 ऑक्टोबर रोजी माजी सैनिक मेळावा
रत्नागिरी, दि. 7 :- मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव यांनी तेथील शिवाजी स्टेडियम येथे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांच्यासाठी रविवार 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मेळाव्यास पी.सी.डी.ए. प्रयागराज, विविध बँका व विविध रेजिमेंट / कोर च्या रेकॉर्ड ऑफीसेसचे प्रतिनिधींद्वारा माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांच्या पेन्शन, स्पर्श, रेकॉर्ड ऑफीस, हयातनामा, इसीएचएस, बँके मार्फत पेन्शन घेत असल्यास व इतर कागदोपत्रांबाबत अडी-अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. त्याकरीता पी.पी.ओ, डीस्चार्ज पुस्तक, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबूक, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल फोन इत्यादी सोबत घेवून सदर मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. मेळाव्यास जाण्यास इच्छुक असलेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८३१७३५०५८४ यावर आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२७१ येथे संपर्क साधावा.




