
“गोगटे-जोगळेकर”च्या प्राणीशास्त्र विभागातर्फे ८ ऑक्टोबर रोजी ‘मधुमक्षिका पालन’ अभ्यास वर्गाचे आयोजन
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘मधुमक्षिका पालन’ या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमवर्ग घेण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान या नव्या उपक्रमाची सुरवात केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरण करण्यासाठी विशेष अनुदान दिले जाते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला हे अनुदान प्राप्त झाले असून या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणपत्र, कौशल्य विकसन व व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे.
या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना ”मधुमक्षिका पालन’ हा व्यवसाय किंवा जोड-व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञ व्यक्तीकडून देण्यात येणार आहे. या अभ्यासवर्गाच्या अधिक माहितीसाठी प्रा. मोहिनी बामणे, प्राणीशास्त्र विभाग यांच्याशी संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांनी या विशेष अभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.




