कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण नेरुरकर यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन
रत्नागिरी नगर वाचनालयाच्या कार्यात मोठा वाटा असलेले व
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते वृद्धापकाळमुळे आजारी होते
मागील अनेक वर्षे रत्नागिरीच्या साहित्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात कार्यरत राहून अरुण नेरुरकर यांनी सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. रत्नागिरी नगर वाचनालयाच्या कार्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता रत्नागिरी नगर वाचनालयाच्या वतीने झालेल्या साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता आपल्या मृदू स्वभावा मुळे त्यांनी अनेक संस्था आणि व्यक्ती जोडल्या होत्या त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे
त्यांची अंत्ययात्रा आज सांयकाळी ०४:०० वाजता त्यांच्या रत्नागिरी येथील पोलीस हेडकॉटर समोरील राहत्या घरातून निघणार आहे.



